Site icon Ashlesha's Recipe

“Poha Chivda-पोहे चिवड्याचं गुपित: कुरकुरीतपणा आणि मसाल्यांचा धमाका”

Poha Chivda Recipe

Poha Chivda-पोह्यांचा चिवडा बनवण्यासाठी कुठल्याही प्रकारचे पोहे वापरु शकतात. मात्र पोह्यांच्या प्रकारा प्रमाणे चिवडा करण्याची पद्धत वेगवेगळी असते.पोह्यांचा चिवडा बनवण्यासाठी जाड पोहे घेतले तर ते तेलात तळून घ्यावे.व माध्यमं जाडीचे पोहे घेतले तर त्या पोह्यांना जास्त वेळ भजावे लागतात.व पातळ पोहे घेतले तर ते पटकन भाजले जातात.पण पोह्यांचा चिवडा बनवण्यासाठी नायलॉन पोहे उत्तम पर्याय आहे.

Read More : Poha Recipe.

थोडे Poha Chivda-पोहे चिवड्या विषयी.

दिवाळी आली कि देशातील सर्व घरांमध्ये चिवडा बनवतात, त्यातील एक चिवडा म्हणजे Poha Chivda-पोह्यांचा चिवडा. हा चिवडा लहानांपासून मोठ्यानंपर्यंत सर्वाना आवडतो. याचा स्वाद गोड आंबट असतो. प्रामुख्याने Poha Chivda-पोह्यांचा चिवडा महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध आहे. Poha Chivda-पोह्यांचा चिवडा हा महिलांसाठी देखील आवडीचा पदार्थ कारण Poha Chivda-पोह्यांचा चिवडा बनवायला लागणारा वेळ, हा चिवडा अतिशय लवकर व सर्वाना आवडणारा आहे विशेष करून लहान मुलांना. Poha Chivda-पोह्यांचा चिवडा अतिशय हलका व पचण्यास सोयीचा असतो. Poha Chivda-पोह्यांचा चिवडा पातळ पोहे भाजून त्यात कढीपत्ता मिरचीची फोडणी देऊन व आपल्या आवडीप्रमाणे सुकामेवा घालून तयार केलेला एक स्नॅक्स. साधारण दिवाळीत फराळाची सुरुवात सर्वात प्रथम चिवडा बनवण्या पासूनच केली जाते. चिवडा बऱ्याच प्रकारात करतात कुरमुऱ्यांचा चिवडा, पातळ पोह्यांच चिवडा, दगडी पोह्यांचा चिवडा, भाजके पोह्यांचा चिवडा अशा अनेक प्रकारात आपल्या आवडीनुसार चिवडा बनवला जातो. परंतु पातळ पोह्यांचा भाजून केलेला चिवडा हा सुद्धा अतिशय खमंग स्वादिष्ट होतो व कमी वेळात तयार होतो. त्यात कढीपत्ता, मिरची व सुकामेवा घातला जातो. पोहे भाजून किंवा तळून दोन्ही प्रकारात हा चिवडा बनवता येतो. भाजून बनवायचा असेल तर पातळ पोहे घ्यावे चिवडा बनवण्यासाठी हल्ली बाजारात नायलॉन पोहे उपलब्ध आहेत ते पोहे लवकर भाजले जातात. तळून करायचा असेल तर जाड प्रकारात मिळणारे दगडी पोहे ते घ्यावे. दिवाळीत सगळेच पदार्थ तळलेला असतात.  म्हणजे चकल्या, शेव, अनारसे, शंकरपाळे असे अनेक प्रकार तळूनच बनवले जातात, म्हणून हा चिवडा भाजून केलेला चिवडा हा सगळ्यांच्या पसंतीस येतो. दिवाळीत अगदी बाजारातही अनेक प्रकारचे तयार केलेल्या चिवडा तुम्हाला मिळतो, परंतु घरी केलेला चिवडा हा खात्रीशीर असतो. तसेच घरी बनवल्यामुळे शुद्धतेची खात्री असते. तसेच चिवडा हा आपल्याकडे वर्षभर खाल्ला जातो. घरात लहान मुले असतील तर अगदी आवर्जून करून ठेवावा लागतो. अशा वेळेस सारखा तेलकट नको किंवा पचायलाही हलका म्हणून या दृष्टीने हा चिवडा अतिशय उत्तम ठरतो.

साहित्य.

कृती.

टिप्स.

POHE CHAKLI – पोहे चकली

पोह्यांपासून पोह्यांच्या चकल्या ही केल्या जातात.या चकल्यांसाठी कुठल्याही प्रकारची पोहे वापरले तरी चालतात. फक्त पोहे भिजवताना थोडी काळजी घ्यावी. जाड पोहे घेतले तर जाड पोह्यांना थोडा वेळ पाण्यात भिजवून ठेवावे लागतात. म्हणजे दोन ते तीन मिनिटांपर्यंत पाण्यात ठेवावे लागतात. मध्यम जाडीचे पोहे घेतले तर ते पोहे नेहमीप्रमाणे भिजवावे. पातळ पोहे घेतले तर नेहमीपेक्षा कमी पाणी व कमी वेळ भिजवावे.

साहित्य.

  • तीन वाट्या पोहे.
  • चार-पाच हिरव्या मिरच्या.
  • थोडी कोथिंबीर.
  • एक चमचा जिरे.
  •  चवीनुसार मीठ.

कृती.

  • पोहे चकली करण्यासाठी प्रथम एका चाळणीत घेवून चाळून घ्यावे.
  • पोहे अगदी थोड्या पाण्याने भिजवून घ्यावे.पोह्याचा लगदा होणार नाही याची काळजी घ्यावी.
  • पोहे थोडे ओले करावे व मिक्सरमध्ये अगदी काही सेकंद फिरवून घ्यावे.म्हणजे चकल्या करण्यासाठी सोपे होईल. त्यानंतर मिरच्या, जिरे,कोथिंबीर मिक्सरमधून बारीक करून घ्यावे .
  • फिरवलेले वाटण व मीठ हे पोह्यांच्या मिश्रणात घालून एकजीव करावे.
  • पोहे मिश्रण छान मळून घ्यावे व चकल्या काढण्यासाठी चकल्यांच्या सोऱ्यामध्ये हे मिश्रण घालून चकल्या काढाव्यात.
  • पोह्याच्या चकल्या कडक उन्हात वाळवून घ्याव्यात. व डब्यात भरून ठेवावे.वर्षभर टिकतात लहान मुलांना आयत्यावेळी तळून खायला द्यावे खूप छान लागतात.

FAQs.

प्रश्न १ :-नियमित Poha Chivda-पोह्यांचा चिवडा खाल्ल्याने त्रास होवू शकतो का ?

उत्तर :- होय, नियमित Poha Chivda-पोह्यांचा चिवडा खाल्ल्याने पित्ताचा त्रास होण्याची शक्यता असते.कारण पोहे पचनासाठी थोडे जड असतात असे मानले जाते.असे असले तरी सुद्धा आपापल्या पचन शक्ती वर अवलंबून असते.

प्रश्न २ :- नाश्त्यासाठी कोणते पोहे वापरावे ?  

उत्तर :- नाश्यासाठी कुठल्याही प्रकारचे पोहे वापरू शकतो.मात्र पोहे भिजवण्याची पद्धत वेगवेगळी असते.याची काळजी घ्यावी.जाड पोहे जास्त वेळ भिजवावे लागतात.त्या तुलनेत मध्यम जाडीचे पोहे कमी वेळेत भिजतात.तसेच पातळ पोहे अजून कमी वेळेत भिजवले जातात.

प्रश्न ३ :-पोहा हा पदार्थ सर्वात जास्त कोणत्या राज्यात खाल्ला जातो ?  

उत्तर :- पोह्यांचे उत्पादन सर्वात जास्त प्रमाणात उज्जैन येथे घेतले जाते. पोह्याची मागणी हि मध्य प्रदेशातील इंदोर, व गुजरात आणि महाराष्ट्रात जास्त प्रमाणात केली जाते.

प्रश्न ४ :-पोहा कोणत्या पदार्थापासून तयार केला जातो ?

उत्तर :- पोहा तांदूळ या धान्या पासून तयार केला जातो.तांदूळ उकळून अर्धवट शिजवला जातो.व दाब देवून चपटा  बनवला जातो.

Exit mobile version