Sabudana Vada-साबुदाणा वडा हा उपवासासाठी खाल्ला जाणारा पदार्थ आहे. Sabudana Vada – साबुदाणा वडा साबूदाणा हिरव्या मिरच्या आले व भाजलेले शेंगदाणे,उकडलेल्या बटाटा,चवीसाठी मीठ, हिरवी मिरची, कोथिंबीर पासून तयार करून तेलात तळला जातो. आपल्या संस्कृतीत उपवासाला अन्यांना साधारण महत्त्व आहे. व्रत वैकल्य व उपवास हे भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे.
साबुदाणा वड्या विषयी.
आपल्या संस्कृतीत उपवासाला अन्यांना साधारण महत्त्व आहे. व्रत वैकल्य व उपवास हे भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे.आपल्याकडे उपवासात खाल्ले जाणारे पदार्थ म्हणजे साबुदाणा,राजगिरा,राजगिऱ्याची लाही, किंवा राजगिऱ्याची पीठ,शिंगाड्याचे पीठ,भगर म्हणजेच वऱ्याचे तांदूळ असे अनेक प्रकार आहेत.पण सर्वात लोकप्रिय प्रकार म्हणजे साबुदाणा किंवा साबुदाण्यापासून बनवलेल्या Sabudana Vada-साबुदाणा वडा हे आहे. Sabudana Vada-साबुदाणा वडा बनवताना मुख्य घटक असतो तो म्हणजे साबुदाणा.साबुदाणा हा स्यागो नावाच्या झाडाच्या चिकापासून बनवला जातो. साबुदाणा म्हणजे पांढऱ्या शुभ रंगाचे खडक दाणे असतात.साबुदाणा हा दोन प्रकारात मिळतो.एक प्रकारचे आपण नेहमी वापरतो तो व दुसरा प्रकार म्हणजे साबुदाण्याचे दाणे अगदी छोट्या आकारात व बारीक असतात. छोट्या आकारातले साबुदाणे लवकर भिजतात.साबुदाणे भिजणे हा त्याच्या दर्जावर अवलंबून असते.उत्तम दर्जाचा साबुदाणा हा लवकर भिजतो व चिकट होत नाही.साबुदाणा महाराष्ट्रात उपासाचे पदार्थ बनवण्यासाठी वापरला जाणारा मुख्य घटक आहे.साबुदाण्यात भरपूर स्टार्च असल्यामुळे उपवासात दिवसभर ऊर्जा मिळवण्यासाठी साबुदाण्याचा वापर केला जातो.साबुदाण्यापासून साबुदाणा खिचडी,साबुदाणा खीर, साबुदाणा वडा,बनवला जातो. साबुदाण्याचे काही पदार्थ बनवून वर्षभर साठवले जातात.म्हणजेच साबुदाणा चकल्या, साबुदाण्याचे पापड, तसेच साबुदाण्यावर प्रक्रिया करून एक वेगळ्या प्रकारचा साबुदाणा बनवला जातो त्याला नायलॉन साबुदाणा म्हणतात. नायलॉन साबुदाणा हा प्रक्रिया करून आकाराने थोडा मोठा झालेला असतो. नायलॉन साबुदाणा तळून त्याच्या तिखट, मीठ,शेंगदाणे घालून चटकदार उपासाचा चिवडा केला जातो. महाराष्ट्रात साबुदाण्यापासून बनवला जाणारा लोकप्रिय पदार्थ म्हणजे साबुदाणा वडा हा आहे.साबुदाणा वडा हा महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध व लोकप्रिय आहे. Sabudana Vada-साबुदाणा वडा हा महाराष्ट्रातील स्ट्रीट फूड च्या यादीत येतो.अनेक शहरांमध्ये साबुदाणा वड्याचे खास अशी हॉटेल्स आहेत जिथे फक्त साबुदाणा वडा बनवला जातो.मुंबईत व अनेक शहरात साबुदाणा वड्याचे सुद्धा स्टॉल ठेले व लागलेले दिसतात. साबुदाणा वडा उपवासातच नाही तर एक नाश्ता म्हणून सुद्धा चहा सोबत चव घेत खाल्ला जातो. साबुदाणा वडा बनवताना चार ते पाच तासासाठी भिजवला जातो. साबुदाणा हा भिजवल्यानंतरच खाण्या योग्य होतो. साबुदाणा हा चार ते पाच तासासाठी भिजवावा साबुदाणा भिजायला किती वेळ लागेल हे त्याच्या दर्जावर अवलंबून असते. छोट्या आकारातील साबुदाणा ही एक तासात भिजतो पण आपल्याकडे सहसामोठया आकाराचा साबूदाणा वापरला जातो. छोट्या आकारातील साबुदाण्याचे पापड बनवले जातात व उपवासात तळून खाल्ले जातात.
साबुदाणा वडा कसा बनवतात.
Sabudana Vada-साबुदाणा वडा बनवताना चार ते पाच तास भिजवलेला साबुदाणा वापरला जातो.भिजवलेल्या साबुदाण्यात उकडलेला बटाटा,भाजलेल्या शेंगदाण्याची पूड घातली जाते.बटाट्यामुळे साबुदाणा वड्याला आकार देणे व तो आकार टिकून राहण्यास मदत होते. शेंगदाण्याची पूड मुळे साबुदाणा वडाला छान कुरकुरीतपणा येतो व तळल्यानंतर रंगही छान येतो. त्यानंतर त्यात चवीसाठी हिरवी मिरची,आले,मीठ,कोथिंबीर व जिरे घातले जाते व मिश्रण तयार केले जाते.या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करूनघ्यावे.एकगोळा हातावर घेऊन घेवुन गोल चपटा आकाराची टिक्की सारख्या आकाराचा वडा बनवला जातो व तेलात तळलाजातो.अशा पद्धतीने साबुदाणा वडा तयार होतो. हा वडा ओल्या नारळाची चटणी किंवा चिंचेच्या चटणी सोबत खाल्ला जातो.
साबुदाणा वडा तयार करताना घ्यायची काळजी
- साबुदाणा भिजवताना साबुदाणा धुवून भिजत घालावा.
- साबुदाणा कडक राहिल्यास थोडे पाणी कोमट करून वरून शिंपडावे किंवा थोडे दूध घालावे साबुदाणा मऊ होतो.
- साबुदाणा वडा बनवताना साबुदाणा मऊ भिजवला गेला पाहिजे. कडक राहिलेला साबुदाण्याचे वडे बनवता येत नाही.वडे तेलात टाकल्यानंतर साबुदाणा मोकळा होतो.
- साबुदाणा हा भिजल्यानंतर साबुदाण्यात पाणी राहत असेल तर ते चाळणीत साबुदाणा टाकून निथळून घ्यावे.
- जास्त पाण्यामुळे साबुदाणा वड्याचे मिश्रण जास्त चिकट होते व तळल्यानंतर साबुदाणा वडा मऊ पडतो.
- चिकट मिश्रणामुळे वडा हा तेलकट होऊ शकतो. म्हणून साबुदाण्यातील पाणी निथळून घ्यावे.साबुदाणा वड्या शेंगदाण्याची पूड फार बारीक नसावी.
- शेंगदाण्याची बारीक पूड करताना तेल सुटते त्यामुळे मिश्रण तेलकट होऊ शकते व वड्याला कुरकुरीतपणा येत नाही.
- साबुदाणा वड्यासाठी बटाटा उकडताना पाणी बेतानेच घालावे,कारण जास्त शिजलेला बटाटा मुळे सुद्धा वडा चिकट व मऊ होतो.
- मऊ झालेला वडा तेल जास्त शोषून घेतो.साबुदाणा वड्यांमध्ये बटाट्याची प्रमाण योग्य असावे. उकडलेल्या बटाटा वडा करताना साबुदाना वड्यास आकार देण्यास मदत करतो, म्हणून घातला जातो.
- जास्तीचा बटाटा हा तुमचा साबुदाणा वडा बिघडवू शकतो.Sabudana Vada-साबुदाणा वडा मंद ते मध्यम आचेवर तळावा.मोठ्या आचेवर तळल्यास मधून कच्चा राहण्याची शक्यता असते.
- साबुदाणा वड्यासाठी आधी तेल गरम करून घ्यावे नंतर आच कमी करावी.
साहित्य :-
- साबुदाणा दीड वाटी.
- बटाटा एक मध्यम आकाराचा.
- शेंगदाण्याची जाडसर पूड अर्धी वाटी.
- मिरच्या पाच ते सहा.
- आले अर्धा इंच तुकडा.
- मीठ चवीप्रमाणे.
- जिरे पाव चमचा.
- कोथिंबीर पाव वाटी बारीक चिरून.
पूर्वतयारी :-
- साबुदाणा वडा करताना चार ते पाच तासासाठी साबुदाणा भांड्यात भिजत घाला.साबुदाणा भिजवताना साबुदाणा धुवून घ्यावा.साबुदाणा धुतल्यानंतर साबुदाणा बुडेल इतके पाणी ठेवावे साबुदाण्याच्या दर्जा नुसार कमी जास्त पाणी लागू शकते.साबुदाणा झाकून ठेवा.
- साबुदाणा वड्यासाठी एका प्रेशर कुकरमध्ये बटाटा उकळायला ठेवा.बटाटा जास्त पाणी घालू नका.
- शेंगदाणे एका कढईत मंद ते मध्यम आचेवर शेंगदाणे भाजून घ्या. शेंगदाणे मंद ते मध्यम आचेवर भाजावे. मंदआचेवर शेंगदाणे भाजायला वेळ लागतो पण शेंगदाणे आतपर्यंत अतिशय खमंग भाजले जातात.
- शेंगदाणे भाजून झाल्यावर शेंगदाण्याची साले काढून टाका व शेंगदाणे स्वच्छ करून घ्या.
- शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यात टाकून पुढ तयार करून घ्या. शेंगदाण्याची पूड चिकट होणार नाही याची काळजी घ्या.
- मिरच्या व आले एकत्र मिक्सरच्या भांड्यात फिरवून घ्या.
कृती :-
- चार ते पाच तासानंतर साबुदाणा भिजलेला असेल तो एका पसरट भांड्यात काढून घ्यावा. साबुदाणा भिजला नसेल तर त्यात थोडे पाणी घालून थोडा वेळ झाकून ठेवा.
- साबुदाणा जास्त भिजला असेल तर चाळणी काढून ठेवा व पाणी निथळल्यावर साबुदाणा वड्यासाठी वापरावा.भिजवलेला साबुदाणा एका पसरट भांड्यात काढून घ्या.त्यात उकडलेल्या बटाटा मॅश करून मिक्स करा.शेंगदाण्याची पूड घाला जिरे.आले मिरचीचे वाटण घाला व मीठ घाला.
- आता सर्व साहित्य मिक्स करून घ्या व छान मिश्रण करून घ्या. मिश्रण फार ओले नसावे पाण्याचा वापर शक्यतो करू नये. पाणी लागल्यास अगदी पाण्याचा हात ओला करून वापरावे. मिश्रण थोडा वेळ झाकून ठेवा.
- पाच ते सात मिनिटानंतर एका कढईत पुरेसे तेल टाकून गॅसवर गरम करायला ठेवा.तेल गरम करून आच कमी करावी.
- आता साबुदाणा वडाच्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून एक गोळा हातावर घ्या.
- वडा करण्याआधी हाताला किंचित पाणी लावून घ्या किंवा एका पॉलिथिन बॅग चे चौकोनी आकाराचे तुकडे कापून त्यावर किंचित पाणी लावून त्या तुकड्यावर वडे गोल व चपटे आकारात थापून घ्यावे.
- तेल तापले असेल तर एका बाजूने हळूच साबुदाणा वडा तेलात सोडा. किंवा साबुदाणा वडा उलथण्यावर घेऊन उलथण्याच्या साह्याने तेलात टाका.
- मंद ते मध्यम आचेवर साबुदाणा वडा सोनेरी रंगावर तळून घ्या. वडा छान कुरकुरीत होतो.
- हिरव्या चटणी सोबत किंवा दह्यासोबत साबुदाणा वडा खायला द्या.
टिप्स :-
- साबुदाणा भिजवताना शक्य असेल तर थोडे पसरट भांडे घ्यावे म्हणजे साबुदाणा सगळा एकसारखा भिजतो.
- खोल भांड्यात साबुदाणा खालच्या बाजूला साबुदाणा चिकट होतो व वरच्या बाजूचा साबुदाणा कमी भिजतो.
- साबुदाणा भिजवताना थोडे दूध घाला दुधामुळे साबुदाणा मवू भिजवला जातो.
- आपल्या नेहमीच्या अनुभवावरून लक्षात येते की साबुदाण्याला किती वेळ लागतो.जास्त वेळ लागत असेल तर अशावेळी साबुदाण्यात कोमट पाणी घालावे.साबुदाणा नेहमीपेक्षा लवकर भिजेल..
- साबुदाण्याचे मिश्रण जास्त पातळ झाले असेल तर त्यात थोडासा साबुदाणा कढईत मध्यम आचेवर भाजून घ्यावा व मिक्सर मधून बारीक फिरवून घ्यावा.ही साबुदाण्याचे पीठ पातळ झालेल्या मिश्रणात थोडे घालावे व थोडावेळ मिश्रण झाकून ठेवावे मिश्रण घट्ट ही होते व साबुदाणा वडा छान कुरकुरीत होतो.
- साबुदाणा वड्या आले अवश्य घालावे आल्यामुळे साबुदाणा वडा पचनास हलका होतो.पातळ मिश्रणामुळे साबुदाणा वड्यात तेल जास्त शोषले जाते त्यामुळे तळण्यासहीतील जास्त लागते. या मिश्रणात पातळ मिश्रणात राजगिऱ्याचे पीठही घालू शकता.राजगिऱ्याचे पीठ थोडेच घालावे नाहीतर साबुदाणा वडा तेलात विरघळतो.
- साबुदाणा वडा डीप फ्राय करायचा नसेल तर शॅलो फ्राय करू शकतात.
- तव्यावर थोडे तेल टाकून पूर्ण तव्यावर पसरवून घ्या व तवा तापल्यावर तव्यावर वडा बारीक थापलेला वडा टाका व थोडा वेळ झाकण ठेवून वाफवून घ्या.थोड्यावेळाने वड्याच्या बाजूने तेल सोडून वडा उलटवून घ्यावा व परत थोडे तेल टाकून भाजून घ्या.
- या पद्धतीने केलेला वडा ही छान होतो व तेलही कमी लागते व कमी खाल्ले जाते.
- ओल्या नारळाची चटणी साबुदाणा वड्या सोबत खायला द्यावा.
दह्यातली ओल्या नारळाची चटणी :-
साहित्य :-
- खवलेला ओला नारळ एक वाटी.
- मिरच्या चार ते पाच.
- मीठ चवीप्रमाणे.
- साखर चवीप्रमाणे.
- कोथिंबीर मूठभर.
- काजू चार ते पाच.
- तूप दोन चमचे
- जिरे अर्धा चमचा.
कृती :-
- नारळ खवण्यासाठी आपल्याकडे खवणी नसेल तर नारळ फोडून घ्या.खोबरे बाजूला काढून घ्यावे.
- खोबऱ्याची काळी साल पिलर च्या साह्याने काढून घ्यावे. व किसून घ्यावे किंवा छोटे छोटे बारीक तुकडे करून घ्यावे.
- साले काढलेली खोबऱ्याची चटणीची चव सुंदर येते.
- नंतर मिक्सरच्या भांड्या खवलेला नारळ, मिरच्या,आले, कोथिंबीर, साखर,मीठ व काजू एकत्र करून एकदम बारीक वाटण करून घ्यावे.
- मीठ साखरेची चव घेऊन बघावी, गरज लागल्यास त्यात वाढवून परत एकदा फिरवून घ्यावे.
- फिरवून झाल्यावर चटणी एका भांड्यात काढून घ्यावे.
- आता फोडणीच्या कढईत एक चमचा तूप टाकून थोडे तापू द्यावे. तूप तापले की त्यात अर्धा चमचा जिरे घालावे.
- जिरे तडतडले की ते तूप चटणीवर घालावे .
- छान मिक्स करून घ्यावी. ही चटणी साबुदाणे वड्या सोबत द्यावी.
- हीचटणी खूप छान लागते साबुदाणा वड्याची चव वाढवते. साबुदाणा वडा दह्यासोबतही खाल्ला जातो साबुदाणा वडाला दया सोबत खूप चविष्ट लागतो .
- टिप्स ओल्या नारळाच्या चटणी काजू घातल्याने चटणीला छान क्रिमि चव येते व थोडा चिकनेपणा येतो.
- काजू भिजवून वापरल्यास उत्तम एक ते दीड तास काजू भिजवून ठेवावे .
- ओला नारळ नसेल तर बाजारात मिळणारे डेसिकेटेड कोकोनट म्हणजेच खोबऱ्याचा कीस वापरला तरीही चालेल.
- साबुदाणा वड्यासाठी दही लावताना आधीच लावावे लागते.दही तयार होण्यासाठी आठ ते दहा तास लागू शकतात. दहीतयार होण्यासाठी वातावरणानुसार कमी जास्त वेळ लागू शकतो. तरीही दही रात्री लावल्यास उत्तम.
घट्ट दही कसे लावावे
- दही लावताना दूध हलके गरम करावे व दुधात साखर घालून विरघळून घ्यावे.
- अर्धा लिटर दुधासाठी एक छोटा अर्धा चमचा आंबट विरजण लावावे.विरजण आंबट नसेल तर थोडे जास्त घ्यावे.
- विरजन लावल्यानंतर दूध रवीच्या साह्याने किंवा इलेक्ट्रिक ब्लेंडर ने एक मिनिटभर फिरवून घ्यावे. फिरवल्यामुळे दही एकदम घट्ट लागते व चवही खूप छान लागते.
FAQs
प्रश्न 1. साबूदाणा वडा तेलातका का विरघळतो ?
उत्तर :- साबूदाणा पुर्ण भिजला नसेल तर साबूदाणा कडक राहतो व बटाटा व शेंगदाणा शेंगदाण्याच्या मिश्रणात मिक्स होत नाही. मिश्रण नीट तयार न झाल्यामुळे साबुदाणा मोकळाच राहतो व तेलात टाकल्यावरवडा विरघळतो.
प्रश्न 2. साबुदाणा वडा तेलकट का होतो ?
उत्तर :- कारण बटाटा जास्त शिजलेला असेल व खूप मिश्रण पातळ असल्यामुळे तेल जास्त शोषून घेते व वडा तेलकट होतो.
प्रश्न 3. वडा वडा तेलकट होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी ?
उत्तर :- वडा तेलकट होऊ नये यासाठी मिश्रण फार पातळ करू नये. बटाटा जास्त शिजवू नये.शेंगदाण्याची पूड जास्त बारीक करू नये.म्हणजे मिश्रण ओलसर होत नाही व वडा तेलकट होत नाही.वडा तळून झाल्यावर लगेचच टिशू पेपरवर टाकावा हा एक पर्याय वापरू शकतो.