Upma-उपमा म्हणजे गव्हाच्या रव्याला फोडणी देऊन केलेला एक पदार्थ. Upma-उपमा हा रव्यापासून बनवला जातो रवा म्हणजे गव्हापासून तयार केलेल्या एक रवेदार घटक.
थोडे Upma-उपमा विषयी.
रव्यापासून आपण बरेच पदार्थ बनवतो Upma-उपमा रवा इडली, रवा डोसा, रव्याचे आप्पे, रव्याचे शंकरपाळे, रव्याचा केक असे अनेक पदार्थात रवा हा वापरला जातो. त्याचप्रमाणे नाश्त्यासाठी Upma-उपमा हा आपला अतिशय लोकप्रिय पदार्थ आहे. उपम्यात कांदा, मुगाची किंवा उडदाची डाळ, जिरे, मोहरीची फोडणी, मिरच्या, आले, लसूण पेस्ट असे पदार्थ घालून Upma-उपमा हा चविष्ट बनवला जातो. अगदी लग्ना त नाश्त्यासाठी असू द्या एखाद्या पार्टीत घरगुती पार्टी कार्यक्रमात Upma-उपमा नाष्टा साठी दिला जातो. रवा हा पचायला हलका असल्याकारणाने तो अगदी आवडीने खाल्ला जातो. तसेच रव्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते त्यामुळे तो हृदयाचे आरोग्य वाढवतो. रव्यामध्ये लोह, मॅग्नेशियम फॉलेट चांगल्या प्रमाणात आढळते. त्यामुळे आपल्या शरीराचे आरोग्य उत्तम राहते. तज्ञांच्या मते मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना रव्याचा म्हणजेच Upma-उपमाचा नाष्टा हा खूप उपयुक्त मानला जातो.उपमा हा एक भारतीय लोकप्रिय नाश्ता आहे गव्हापासून तयार केलेल्या रव्याला फोडणी देऊन उपमा तयार केला जातो. Upma-उपमा करताना कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर, मुगाची डाळ, उडदाची डाळ असे पदार्थ वापरून त्याला स्वादिष्ट बनवला जातो.स्वादासाठी थोडे काजू ही वापरले जातात.उपमा हा तेलात किंवा तुपात दोन्ही प्रकारे करता येतो. उपमा हा एक पारंपरिक नाष्टा आहे उपमा अगदी प्रत्येक रेस्टॉरंट हॉटेलमध्ये सहज मिळतो.
Upma-उपमा कसा करावा.
Upma-उपमा तयार करताना प्रथम रवा भाजून घ्यावा. नंतर तेल किंवा तूप घेऊन त्यात फोडणी करून मोहरी, जिरे, मिरची,आले,लसूण,मुगाची किंवा उडदाची डाळ, टोमॅटो,असे पदार्थ फोडणे वापरून घेतात. नंतर त्यात थोडे पाणी घालून पाणी उकळले की त्यात रवा घालून ढवळून घेतात व झाकण ठेवून छान वाफवून घ्यावा. वरून कोथिंबीर किसलेले खोबरे व लिंबू पिळून गरमागरम खायला द्यावा.गरमच खाल्ला जातो व छानही लागतो.
साहित्य.
- अर्धा टमाटा टमाट्याच्या कापलेल्या फोडी.
- पाच-सहा पाने कढीपत्ता.
- बारीक रवा एक वाटी.
- हिरव्या मिरच्या दोन.
- पाव चमचा मोहरी.
- अर्धा चमचा जिरे.
- चिमूटभर हिंग.
- तीन-चार काजू.
- थोडी कोथिंबीर.
- मीठ चवीनुसार.
कृती.
- उपमा तयार करण्यासाठी प्रथम रवा तेलावर छान मंद आचेवर भाजून घ्यावा. भाजलेल्या रव्याचा उपमा छान होतो.
- भाजलेला रवा एका भांड्यात काढून कढईत फोडणीसाठी तेल घ्यावे.
- आता तेल तापले की प्रथम मोहरी टाकावे मोहरी कडकडली की जिरे घालावे व जिरे तडतडून घ्यावे नंतर चिमूटभर हिंग घालावा कढीपत्ता घालावा व त्यात बारीक चिरलेल्या मिरच्या घालावी.
- आता फोडणीत कांदा घालावा छान परतून घ्यावा कांदा परतत आला की टोमॅटोच्या फोडी घालाव्या.
- टोमॅटो छान परतून घ्यावा टोमॅटो परतला की त्यात पाणी घालावे सुरुवातीला पाणी थोडेच घालावे बारीक रव्याला पाणी कमी लागते पाणी उकळले की त्यात भाजलेला रवा घालून सतत ढवळत राहावे म्हणजे रवा छान मिक्स होईल.
- पाण्याची गरज लागल्यास वरून गरम केलेले पाणी घालावे रव्याला छान चव येते व रवा गोळा होत नाही.
- आता उपमेला वाफ आणून घ्यावी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.
- उपमा गरमच खायला द्यावा गरमच खाल्ला जातो व स्वादही छान येतो उपमा खायला देताना त्यावर किसलेले खोबरे व लिंबू पिळा.
हल्ली बाजारात इन्स्टंट उपमा मिळतो, म्हणजे नुसतच पाण्यात उकळून उपमा तयार केला जातो. पण हाच इन्स्टंट उपमा आपण अगदी आपल्या घरी सहज बनवून ठेवू शकतो. अगदी आयत्यावेळी पाणी गरम करून त्यात हा उपमा टाकून दोन मिनिटात उपमा तयार होतो. आपण तोच इन्स्टंट उपमा कसा तयार करायचा ते पाहू.
साहित्य.
- रवा एक वाटी.
- चार-पाच कढीपत्त्याची पाने.
- दोन ते तीन चमचे उडदाची डाळ/मुगाची डाळ.
- एक ते दोन हिरव्या मिरच्या.
- रवा भाजण्यासाठी तेल.
इन्स्टंट उपमा घरी कसा तयार करावा.
- इन्स्टंट उपमा करण्यासाठी प्रथम एका कढईत डाळ घेऊन मंद आचेवर खमंग भाजून घ्यावे, डाळ सतत हलवत राहावे जेणेकरून ती करपणार नाही.
- जास्त भाजली गेलेली डाळ ही उपम्याची चव बदलवू शकते डाळ व्यवस्थित भाजून झाल्यानंतर एका भांड्यात काढून गार करून घ्यावे.
- आता त्याच कढईत थोडे दोन ते तीन चमचे तेल घालून रवा मंद आचेवर अगदी व्यवस्थित भाजून घ्यावा. रवा मंद आचेवरच भासावा मोठ्या आचेवर भाजल्याने रवा मध्येपर्यंत भाजला जात नाही.
- रवा पूर्णपणे भाजून झाल्यावर तो सुद्धा एका भांड्यात बाजूला काढून घ्यावा.
- आता गार झालेली डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी करकरीत फिरवून घ्यावी. डाळ अगदी बारीक वाटू नये थोडी रविदार असू द्यावी.
- आता त्याच कढईत परत दोन ते तीन चमचे तेल टाकावे तेल तापले की त्यात मोहरी टाकावी मोहरी तडतडली की अगदी चिमूटभर हिंग घालावा व जिरे घालावे.
- जिरे तडतडले की मिरची कापून टाकावी मिरची ही चांगली तळून घ्यावी त्यातच कढीपत्ता घालावा व कडीपत्ता आहे थोडा कुरकुरीत करून घ्यावा.
- हे सगळे पदार्थ चांगले कुरकुरीत झाले की त्यात रवा घालावा.
- मंद आचेवर रवा दोन ते तीन मिनिटे फोडणीत परतून घ्यावा.
- रवा मंद आचेवरच परतावा जेणेकरून तो जास्त भाजला जाणार नाही व काळा होणार नाही.
- आता त्यात मिक्सरमधून फिरवलेली डाळ टाकून मिक्स करून घ्यावी मिनिटभर परतून घ्यावं व गॅस बंद करावा.
- मीठ आयत्या वेळेस घालावे.
- आता टाकलेल्या मिरच्या आपण बाजूला काढून ठेवू शकतो कारण मिरच्या जर थोड्या ओलसर असतील तर रवा खराब होण्याची शक्यता असते.
- भाजलेला रवा पूर्णपणे गार झाल्यावर एका हवाबंद डब्यात भरून ठेवावा.
- पाण्याशी संपर्क येऊ देऊ नये एक ते दीड महिना किंवा त्यापेक्षा जास्त हा रवा टिकतो गरज वाटल्यास आपण तो फ्रीजमध्ये ठेवू शकतो.
आता उपमा कसा तयार करावा.
- इन्स्टंट उपमा तयार करण्यासाठी एका भांड्यात थोडे पाणी ठेवावे. पाण्यात गरजेनुसार मीठ घालावे व पाण्याला उकळी आणावे.
- पाणी उकळले की त्यात आपण भाजून तयार केलेला रवा हळूहळू पाण्यात टाकावा व एका बाजूने हलवत राहावा पूर्णपणे पाण्यात किंवा मिक्स झाला की झाकण ठेवून त्याला वाफ आणावी पाणी गरजेनुसार घ्यावे.
- याच पद्धतीने आपण अर्धा किलो किंवा एक किलो प्रमाणात रवा तयार करून ठेवू शकतो खूप दिवस टिकतो.
- अगदी बाजारात मिळणाऱ्या इन्स्टंट उपम्यासारखाच लागतो.
- घरी तयार केल्यामुळे शुद्धता व पौष्टिकतेची खात्री असते.
टीप.
- गरज वाटल्यास आपण मिरची पाण्या त घालू शकतो मिरची कापून पाण्यात उकळून घ्यावे.
- इन्स्टंट उपमा तयार करताना डाळ अवश्य घालावे व भाजताना काळजीपूर्वक भाजून घालावी खूप छान स्वाद येतो.
- डाळ आपल्या आवडीप्रमाणे मुगाची किंवा उडदाची घेऊ शकतो.
- आपल्या आवडीनुसार भाज्या म्हणजेच टोमाटो,मटार गजर घालू शकतो.
- भाज्या घालतांना थोड्या वाफवून घ्याव्या नंतर उपम्या मध्ये घालाव्या उप्म्याला छान स्वाद येतो.