Pav Bhaji – पावभाजी एक भारतीय स्ट्रीट फूड मधील एक प्रसिद्ध व लोकप्रिय पदार्थ आहे. Pav Bhaji – पावभाजी ही अनेक भाज्या एकत्र करून बनवली जाते.
थोडे पावभाजी विषयी.
Pav Bhaji – पावभाजी एक भारतीय पदार्थांमधील एक प्रसिद्ध पदार्थ आहे. समोसा पाणीपुरी सारखे प्रसिद्ध स्ट्रीट फूड प्रमाणे पावभाजी सुद्धा आपल्या देशातील अनेक राज्यांमध्ये व मोठ्या शहरांमध्ये लोकप्रिय झाली आहे. Pav Bhaji – पावभाजी स्ट्रीट फूड च्या यादी सुद्धा अग्रभागी आहे . पावभाजी बनवण्यासाठी अनेक भाज्या वापरल्या जातात . जसे टोमॅटो, बटाटे, कांदा, फ्लावर, पत्ताकोबी, सिमला मिरची, तसेच आपल्याला आवडत असलेल्या व ऋतुमानानुसार उपलब्ध असलेल्या भाज्या घातल्या जातात. त्याच बरोबर चवीसाठी आले लसूण पेस्ट, लाल तिखट घातले जाते.पावभाजीला एक विशिष्ट असा स्वाद असतो त्यासाठी पावभाजी मसाला वापरला जातो. त्यासाठी ठराविक प्रमाणात मसाल्याचे पदार्थ वापरुन हा मसाला तयार केला जातो. पावभाजी ही वेगवेगळ्या प्रकारात केली जाते . जसे खडा पावभाजी, बटर पावभाजी, चीज पावभाजी.
पावभाजीचे वेगवेगळे प्रकार.
- खडा पाव भाजी :- खडा पाव भाजी करताना भाज्या कुस्करून न घालता भाज्यांच्या मोठ्या मोठ्या फोडी करून घातल्या जातात.
- बटर पावभाजी :- बटर पावभाजी करतांना भरपूर प्रमाणात लोणी घालून केली जाते.चीज पावभाजीमध्ये भरपूर प्रमाणात चीज वापरली जाते.
- गुजराती पावभाजी :- गुजराती पावभाजी ही केली जाते.गुजराती पावभाजी बटाटा व कांदा लसूण न घालताच बनवलेली जाते. गुजराती पावभाजीत बटाटा ऐवजी कच्च्या केळीचा वापर केला जातो .अशा पद्धतीने घालून केलेली पावभाजी सुद्धा छान चव देते.
- कोल्हापुरी पावभाजी :- कोल्हापुरी पावभाजी ही कोल्हापुरी मसाला घालून बनवली जाते.या भाजीमध्ये तिखट जास्त प्रमाणात घालून बनवली जाते. तसेच कोल्हापुरी मसाला वापरला जातो.
- पंजाबी पावभाजी :- पंजाबी पाव भाजी मध्ये भरपूर प्रमाणात बटर वापरून वापरले जाते. तसेच काही ठिकाणी पाव भाजी मध्ये मशरूम वापरले जाते मश्रूमचे तुकडे करून फोडणीत वाफवून मिक्स केले जातात.
- पनीर पावभाजी :- पनीर पाव भाजी मध्ये पनीरचे तुकडे किंवा किसलेले पनीर घातले जाते.
- गुजराती पावभाजी :- गुजराती पावभाजी कांदा लसूण न घालता बनवतात गुजराती पाव भाजी मध्ये बटाटे ऐवजी कच्ची केळी वापरली जाते.पाव हे मैद्यापासून तयार केले जातात. पाव बनवणे फार वेळ खाऊ असते म्हणून पाव बेकरीतून आणले जातात.
पावभाजीचा इतिहास.
Pav Bhaji – पावभाजी हा पदार्थ 1850 च्या दशकात मुंबईमधील एका कापड गिरणी मध्ये तयार करण्यात आली. कापड गिरणीतील कामगारांना जेवणात हलके व पौष्टिक जेवण द्यावे या विचाराने त्यांना वेगवेगळ्या भाज्या एकत्र शिजवून त्याची भाजी करून देण्यात आली. सुरुवातीला भाजीसोबत पोळी देण्यात आली नंतर पोळी ऐवजी मैद्याचा पाव देण्यात येऊ लागला. पावभाजी बनवण्यास सोपी व पौष्टिक आहे . यामुळे कामगारांना पूर्ण पोषण मिळेल व पावभाजी करण्याला सुद्धा कमी वेळ लागेल असे अनेक हेतू साध्य करण्यासाठी पावभाजी बनवण्यात आली. गिरणी कामगारांना प्रथम पावभाजी सोबत भात व पोळी देण्यात येत होती. नंतर पोळीच्या जागी पाव देण्यात येऊ लागला . त्या नंतर मात्र पाव आणि भाजी हेच समीकरण झाले व पावभाजी स्ट्रीट फूड च्या स्वरूपात प्रसिद्ध झाली व लोकप्रिय झाली.
पावभाजी कशी बनवतात – How To Make Pav Bhaji.
Pav Bhaji – पावभाजी बनवताना अनेक भाज्या घातल्या जातात.जसे टमाटे, फ्लावर, कांदा, मटार, सिमला मिरची या भाज्या एकत्र शिजवून घेतात. नंतर शिजवलेल्या भाज्या कुस्करून घेतात नंतर कांदा बारीक चिरून घातला जातो. भाज्या शिजवून झाल्यावर त्यांना फोडणी दिली जाते. फोडणीसाठी तेल, तूप किंवा लोणी काही वापरले जाते व चवीसाठी आले-लसूण घातले जाते. पावभाजीला ठराविक अशी चव असते. त्या चवीसाठी खास Pav Bhaji – पावभाजी मसाला असतो तो घातला जातो. पावभाजी तयार झाल्यावर पाव सोबत दिली जाते. वरून कोथिंबीर व लोणी घातले जाते.पाव बनवणे फार वेळ खाऊ असते म्हणून पाव बेकरीतून आणले जातात.पाव हे मध्य भागी कापून त्यावर बटर लावून गरम करून घेतात .
साहित्य.
- टमाटे पाव किलो.
- बटाटे चार .
- कांदे मोठ्या आकाराचे दोन .
- मटर अर्धी वाटी.
- फ्लावर चे फुलं अर्धी वाटी .
- सिमला मिरची दोन.
- पत्ता कोबी पाव किलो.
- गाजर एक ते दोन.
- कसुरी मेथी दोन चमचे.
- कोथिंबीर चिरून घेतलेली अर्धी वाटी.
- एक छोटा तुकडा बीट.
- लसूण आठ ते दहा पाकळ्या .
- आले एक दीड इंच.
- गरजेनुसार लोणी.
पूर्वतयारी.
- Pav Bhaji – पावभाजी बनवताना प्रथम आले लसणाची पेस्ट तयार करून घ्यावी.
- सर्व भाज्या थोड्या मोठ्या फोडी करून चिरून घ्याव्यात म्हणजे योग्य प्रकारे शिजवल्या जातील.
- पत्ताकोबी किसून घ्यावा व थोडे मीठ टाकून थोडा वेळ बाजूला ठेवावे कांदा बारीक कापून घ्यावा.
- टमाटा बारीक चिरून घ्या. तसेच कांदाही बारीक चिरून घ्यावा.
कृती.
- Pav Bhaji – पावभाजी बनवताना प्रथम सर्व भाज्या स्वच्छ धुऊन घ्याव्यात एक कुकर घेऊन कुकरच्या भांड्यात बटाटे फ्लावर चे फुलं गाजर मटार या भाज्या एकत्र करून कुकरमध्ये थोडे पाणी घालून चार ते पाच शिट्ट्या घेऊन शिजवून घ्याव्यात.
- भाज्या चांगल्या प्रकारे शिजवल्या गेल्या पाहिजे कुकरच्या चार ते पाच शिट्ट्या झाल्यावर बंद करून कुकर गार करायला ठेवा.
- आता कुकर गार झाल्यावर भाज्या बाहेर काढून चांगल्या प्रकारे मॅश करून घ्यावे.
- आता मीठ लावून ठेवलेल्या कोबी दोन्ही हाताने घट्ट पिळून मिठाचे पाणी काढून घ्यावे.
- आता एका कढई गॅसवर ठेवून त्यात फोडणीसाठी तेल किंवा तू प टाकून तापायला ठेवावे.
- तेल तापल्यावर त्यात फोडणीसाठी प्रथम मोहरी घालावी. मोहरी तडतडली की थोडा हिंग घालावा नंतर जिरे घाला.
- आता फोडणी बारीक चिरलेला कांदा घाला व चिमूटभर मीठ घालून चांगला परतून घ्या .कांदा गुलाबी रंगावर परतून झाल्यावर त्यात चिरलेले टोमॅटो घाला व तेही छान परतून घ्या. टोमॅटो चांगला परतल्यामुळे टोमॅटोचा कच्चेपणा व आंबटपणा कमी होतो. आता त्यात किसलेला पत्ताकोबी घाला व छान परतून घ्या. टोमॅटो व कोबीच्या मिश्रणाला छान तेल सुटेपर्यंत परतावे.
- आता त्यात हळद, आले ,लसूण पेस्ट, लाल तिखट घाला व थोडा वेळ परतून घ्या.
- आता त्यात पावभाजी मसाला घाला व तोही परतून घ्या.
- आता परतलेल्या मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत परता व त्यात मॅश केलेल्या भाज्या घाला व गरजेनुसार मीठ घाला व छान परतून घ्या.
- Pav Bhaji – पावभाजी आपल्या आवडीप्रमाणे घट्ट पातळ बघून पाणी घाला. वरून थोडी कसुरी मेथी चुरून पावभाजी मध्ये घालावे .भाजीला छान स्वाद येतो. नंतर चिरलेली कोथिंबीर घाला. व थोडा पावभाजी मसाला घाला.
- आता एक उकळी आणा व उकळी आल्यावर गॅस बंद करा.व बटर लावून गरम केलेल्या पाव सोबत सर्व्ह करा.
टिप्स :-
- पाव भाजी साठी टोमॅटो घेतांना टोमॅटो हे पूर्ण पिकलेले म्हणजे छान लाल रंग असलेले घ्यावे त्यामुळे पावभाजीला सुंदर रंग येतो.
- Pav Bhaji – पावभाजी करताना टोमॅटोचे प्रमाण थोडे जास्त घ्यावे त्यामुळे पावभाजीचा स्वाद व रंग छान येतो तसेच टोमॅटो तेलात चांगले परतून घ्यावे म्हणजे टोमॅटोचा कच्चेपणा व आंबटपणा निघून जातो.
- पावभाजीला रंग छान येण्यासाठी भाज्या शिजवताना एक छोटा तुकडा बीटाचा घालावा.
- Pav Bhaji – पावभाजी करताना पत्ताकोबी सिमला मिरची किसून घ्यावी वाफवू नये.
- Pav Bhaji – पावभाजी साठी भाज्या शिजवताना भाज्या वाफवताना भाज्यांना पाणी सुटते ते पाणी फेकून न देता भाजी करताना भाजी मध्ये घालावे.
FAQs :-
प्रश्न १ :- पावभाजीला सुंदर लाल रंग येण्यासाठी काय करावे ?
उत्तर :- पावभाजीला लाल रंग येण्यासाठी टोमॅटो हे पूर्ण पिकलेले म्हणजे छान लाल रंग असलेले घ्यावे. तसेच काश्मिरी लाल मिरची पावडर चा वापर करावा .त्यामुळेही सुंदर रंग येतो तसेच भाज्या शिजवताना त्यात बीटचा एक छोटा तुकडा घालावा त्यामुळे ही पावभाजीचा रंग छान येतो.हॉटेल्स च्या पावभाजी त लाल रंग घातलेला असतो.
प्रश्न २ :- पावभाजी साठी कोणत्या भाज्या वापराव्या ?
उत्तर :- पावभाजी साठी बटाटा, कांदा,सिमला मिरची,टोमॅटो, पत्ताकोबी, हिरवी मटार, फ्लावर, या भाज्या वापरल्या जातात. तसेच ऋतुमानानुसार उपलब्ध असलेल्या भज्या घेवू शकतो .मात्र पालेभाज्या, वांगे ,भेंडी घेऊ नये यामुळे पाव भाजीची चव बिघडू शकते.
प्रश्न ३ :-पावभाजी ही पौष्टिक आहे का ?
उत्तर :- हो पावभाजी ही नक्कीच पौष्टिक ठरू शकते त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक भाज्या वापरल्या जातात त्यामुळे तिचा पौष्टिकपणा वाढतो पण पौष्टिकतेचा विचार केला तर पाव ऐवजी तुम्ही पोळी सोबत खाऊ शकता.