Site icon Ashlesha's Recipe

Sabudana khichdi-साबुदाणा खिचडी अशा पद्धतीने केली तर अजिबात चिकट होणार नाही.

Sabudana Khichdi-साबुदाणा खिचडी हि महाराष्ट्रात उपवासासाठी खाला जाणारा महत्वाचा पदार्थ आहे. आपला भारत देश हा व्रत वैकल्याचा देश आहे.चैत्र महिना ते फाल्गुन महिन्यापर्यंत सतत कुठले ना कुठले व्रत वैकल्य व सण वार, उपवास चालूच असतात.व्रत आले म्हणजे उपवास आलेच सोमवार,मंगळवार,गुरुवार, एकादशी, चतुर्थी, पौर्णिमा, महाशिवरात्री असे आठवड्यात एक-दोन दिवस तरी उपवास असणारे व्यक्ती घराघरात असतात.उपवास म्हटला म्हणजे त्याचे काहीतरी खाण्यापिण्याचे नियम असतात. कारण प्रत्येकाला अगदी काहीही न खाता राहावले जात नाही. काही जण अगदी कडक उपवास करतात.पण प्रत्येकाला ते जमेलच असे नाही.अशा वेळेस काहीतरी फराळ करावाच लागतो. त्यात सर्वात आधी येते ते म्हणजे साबुदाणा. Sabudana Khichdi-साबुदाणा खिचडी, किंवा साबुदाणे वडे , साबुदाणा खीर असे पदार्थ.

Read More : Sabudana Vada Recipe                                                                                                               

थोडे साबुदाण्याविषयी.

साबुदाणा म्हणजे एका विशिष्ट झाडाच्या चिकापासून तयार केला जातो. साबुदाण्याचे पांढऱ्या रंगाचे मोत्या प्रमाणे गोल आकाराचे छोटे व कडक दाणे असतात. Sabudana Khichdi-साबुदाणा खिचडी मध्येजास्त प्रमाणात कर्बोधके असतात.त्यामुळे दिवसभर शरीराला ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत होते. साबुदाण्यासोबत त्यात हिरवी मिरची किंवा लाल तिखट शेगदाण्याची जाडसर पूड,बटाटे, थोडे किसलेले खोबरे, पचनासाठी थोडेसे आले असे पदार्थ घालून साबुदाणा चविष्ट बनवला जातो.साबुदाण्याची पदार्थ बनवताना कमीत कमी चार ते पाच तास पाण्यात भिजवून ठेवावा. तसे तर साबुदाणा किती वेळ पाण्यात भिजवावा याचा वेळ त्याच्या म्हणजेच साबुदाण्याच्या दर्जावर ठरतो. म्हणजेच साबुदाणा कोणत्या दर्जाचा आहे यावर ते अवलंबून असते.काही साबुदाणे अगदी दोन तासात सुद्धा मऊ भिजवले जातात. काही साबुदाण्यांना सात ते आठ तास पाण्यात भिजवून ठेवावे लागतात.आपण कुठल्या प्रकारचा साबुदाणा वापरात घेतो त्यावरून ते ठरवावे. साबूदाणा भिजवल्या.नंतरच खाण्यायोग्य होतो.नंतर त्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात.साबुदाणा पासून वर्ष भर टिकतील व वापरता येतील असे पदार्थ ही बनवले जातात. म्हणजे वर्षभर वाळवणाच्या रूपात साबुदाण्याचे पापड बनवून डब्यात भरून वर्षभर साठवता येतात. बटाटा व साबुदाणा एकत्र करून चकल्या बनवल्या जातात. हे पदार्थ वर्षभर हवे तेव्हा आपल्याला खाता येतात. तसा तर साबुदाणा पचण्यास खूप जड असतो.बऱ्याच जणांना तो खाल्ल्यावर पित्ताचा किंवा पोटदुखीचा ही त्रास होतो.परंतु जर तो बनवताना पचनासाठीचे पदार्थ वापरले गेले तर तो पचायला हलका होतो.जसे साबुदाणा खिचडी वर लिंबू पिळून खावे. लिंबू हा साबुदाणा बसवण्यासाठी चा उत्तम पर्याय आहे.तसेच साबुदाणा खिचडी मध्ये आले किसून अवश्य घालावे, म्हणजे त्याच्याने पित्ताचा त्रास होत नाही व पचण्यास सोपा होतो.तसेच साबुदाणा खिचडी करताना खोबऱ्याचा कीस घातल्याने साबुदाणा मुळेशरीराला येणारा कोरडेपणा येतो, तो कमी होण्यास मदत होते व पचायलाही बरे पडते.

साबुदाणा खिचडी कशी बनवतात.

साबुदाणा खिचडी बनवताना प्रथम तो चार ते पाच तासासाठी पाण्यात भिजवला जातो.नंतर त्यात चवीसाठी शेंगदाण्याची बारीक केलेली पूड.मिरची,बटाटा,किसलेले खोबरे,मीठ,लिंबू सोबत बनवले जातात.लिंबू मुळे साबुदाणा पचायला हलका होतो. काही ठिकाणी उपवासांना तिखट मीठ खाल्ले जात नाही.अशा वेळेस साबुदाण्याची साखर शेंगदाण्याची जाडसर पूड घालून गोड साबुदाणा खिचडी सुद्धा बनवली जाते.

साबुदाणा खिचडी तीन प्रकारे बनवता येते.

प्रकार १ : साबुदाण्याची तिखट खिचडी.

साहित्य.

कृती.

प्रकार २  :- साबुदाण्याची गोड खिचडी.

साहित्य.

कृती.

  • Sabudana Khichdi-साबुदाणा खिचडी बनवताना प्रथम साबुदाणे दोन ते तीन पाण्याने धुऊन घ्या म्हणजे साबुदाण्यातला जास्तीत जास्त स्टार्च निघून जाईल व Sabudana Khichdi-साबुदाणा खिचडी जास्त चिकट होणार नाही.
  • साबुदाणा धुवून झाल्यावर साबुदाणा बुडेल इतके पाणी ठेवून ठेवा व त्यात अर्धा कप दूध घाला दुधाने साबुदाणा छान मऊ भिजवला जातो व चवीला छान लागतो व चार ते पाच तासासाठी झाकून ठेवा.
  • आता एका जाड बुडाच्या कढईत शेंगदाणे छान खमंग भाजून घ्यावे.
  • Sabudana Khichdi-साबुदाणा खिचडी साठी शेंगदाणे भाजताना मंद आचेवर भाजावे. म्हणजे शेंगदाणा अगदी आतून भाजला जातो वरून सोनेरी रंगा येईपर्यंत शेंगदाणा भाजावा.म्हणजे अतिशय खमंग लागतो व शेंगदाण्याची पूड चिकट होत नाही व Sabudana Khichdi-साबुदाणा खिचडीला छान चव येते.
  • आता बटाट्याची साले काढून छान त्याचे पातळ काप करावे.पातळ काप तुपात लवकर परतले जातात.
  • Sabudana Khichdi-साबुदाणा खिचडीत बटाटा उकडून साले काढून व फोडी करूनही टाकला जातो. उकडलेल्या बटाट्याच्या फोडी ही Sabudana Khichdi-साबुदाणा खिचडीत खूप छान लागतात. आवडत असल्यास तसे टाकू शकतात.
  • चार पाच तासानंतर साबुदाणा छान भिजला असेल तर एका कढईतफोडणीसाठी तीन-चार चमचे तूप घ्या,तेल वापरत असाल तर ते घ्या.परंतु तुपातली साबुदाण्याची खिचडी खूप चविष्ट लागते.
  • तूप तापले की त्यात जिरे घाला.जिरे तडतडले की मिरचीचे तुकडे घाला व मंद आचेवर परतून घ्या.
  • दोन मिनिटांनी बटाट्याच्या फोडी घाला व त्याचबरोबर थोडे चिमूटभर मीठ घालून झाकण ठेवून वाफवून घ्या, मीठ घातल्यामुळे साबुदाणा खिचडी खाताना बटाटे आळणी लागत नाही.
  • बटाटा छान वाफवून झाले की त्यात भिजवलेला साबुदाणा हाताने मोकळा करून टाका व मंद आचेवर छान परतून घ्या.
  • साबुदाणा थोडा परतला गेला की त्यात शेंगदाण्याचे जाडसर पूड घाला व छान परतून घ्या.नंतर आले किसून घाला व साबुदाणा परत एकदा छान परतवून घ्या.थोडा वेळ झाकण ठेवून वाफवून घ्या.
  • साबुदाणा वाफवला गेला की तो पारदर्शक व्हायला लागतो. साबुदाणा खिचडी पारदर्शक होईपर्यंत त्याला सतत परतत राहा. म्हणजे तो खाली लागणार नाही.
  • Sabudana Khichdi-साबुदाणा खिचडी होत आली की त्यात अर्धी वाटी किंवा पाव वाटी ताक घालायचे.ताका मुळे Sabudana Khichdi-साबुदाणा खिचडी ला छान विशिष्ट अशी चव येते व साबुदाण्याचा चिकटपणाही राहत नाही.
  • आता मीठ घालून Sabudana Khichdi-साबुदाणा खिचडी परतून घ्या.वरून थोडी कोथिंबीर खोबरे घाला.कोथिंबीर फोडणीच्या तुपात घालू शकतो.तशी कोथिंबीरची साबुदाणा खिचडीला ला छान चव येते.
  • आता साबुदाणे पाच मिनिटांपर्यंत छान परतून घ्या. व झाकण ठेवून एक वाफ आणा.एक वाफ आणल्यावर Sabudana Khichdi-साबुदाणा खिचडी खायला द्या.साबुदाणा खिचडी गरमच छान लागते.साबुदाणा खिचडी वरून लिंबू पिळून खायला द्यावी.
  • लिंबू हा पचनासाठी उत्तम असतो.काही जणांना सोबत दही आवडते तसेही खाता येते.

प्रकार ३  :- इन्स्टंट साबुदाणा खिचडी.

कधी कधी साबुदाणा भिजवायला लक्षात राहत नाही.अशावेळी काय करावे असा प्रश्न पडणे साहजिक असते.कारण साबुदाणा भिजायला कमीत कमी सात ते आठ तास लागतात.अशावेळी साबुदाणा हा आयत्यावेळी किंवा अचानक लागणारा पदार्थ नाही हे लक्षात येते.पण साबुदाणा सुद्धा प्रेशर कुकरच्या साह्याने आयत्यावेळी करता येऊ शकतो म्हणजेच साबुदाणा खिचडी सुद्धा इन्स्टंट साबुदाणा खिचडी होऊ शकते.अगदी आपली नेहमीच्या साबुदाणा खिचडी सारखी प्रेशर कुकर मध्ये सुद्धा होते. त्यासाठी फक्त थोडी काळजी घ्यावी लागते. बघूया प्रेशर कुकरमध्ये साबुदाणा खिचडी कशी करावी.

साहित्य.

पूर्वतयारी.

कृती.

टिप्स.

FAQs.

प्रश्न १ :- प्रेग्नेंसी मध्ये साबुदाणा खिचडी खाऊ शकतो का ?

उत्तर :- प्रेग्नेंसी मध्ये साबुदाणा खिचडी खाऊ शकतो, परंतु साबुदाणा हा पचायला जड असल्या कारणाने जास्त खाल्ल्यास प्रेग्नेंट स्त्रीला  त्याचा त्रास होण्याची शक्यता असते, म्हणून जरा जपूनच खावा.

प्रश्न २ :- साबुदाणा खिचडी कुकरमध्ये बनवता येते का ?

उत्तर :- साबुदाणा खिचडी कुकर मध्ये बनवता येते. अगदी आपल्या नेहमीच्या खिचडी सारखी होते, परंतु आयत्या वेळेस केल्यामुळे थोडी चिकट होऊ शकते.

प्रश्न ३ :- साबुदाणा  हा ग्लुटेन फ्री असतो का ?

उत्तर :-साबुदाणा हा ग्लुटेन फ्री-Gluten Free असतो. बऱ्याच ठिकाणी सकाळी नाश्त्यासाठी व संध्याकाळी स्नॅक्स साठी साबुदाणा खिचडी खाल्ली जाते. परंतु ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी साबुदाणा खाणे योग्य नाही.

Exit mobile version