Site icon Ashlesha's Recipe

“Veg Biryani-वेज बिर्याणीचा रॉयल स्वाद: एक सोपी आणि झटपट रेसिपी”

Veg Biryani – मिक्स व्हेज बिर्याणी म्हणजे एक प्रकारचा भात. यामध्ये वेगवेगळ्या मसाले घालून व भाज्या घालुन करतात.भात हा सर्वांना आवडणारा पदार्थ आहे. भाताची पहिली ओळख आपल्याला लहानपणीच होते भाताच्या पेजेच्या स्वरूपात. Veg Biryani – मिक्स व्हेज बिर्याणीम्हणजे याच भातात ठराविक प्रकारचे मसाले व भाज्या घालून तयार केली जाते.काही व्यक्ती मांसाहार खात नाहीत अशा व्यक्तींना व्हेज बिर्याणी Veg Biryani हा उत्तम पर्याय आहे. अतिशय चविष्ट व लोकप्रिय पदार्थांमध्ये Veg Biryani – मिक्स व्हेज बिर्याणी गणली जाते. व्हेज बिर्याणी बासमती तांदळापासून बनवतात. वेगवेगळ्या भाज्या घालून केल्यामुळे तिचा पौष्टिक पना ही वाढतो व चवही वाढते व एक रुचकर पदार्थ तयार होतो व्हेज बिर्याणी करताना शक्यतो जुना तांदूळ वापरावा.

Read More : Aloo Paratha Recipe.

थोडे मिक्स व्हेज बिर्याणी विषयी.

Veg Biryani – मिक्स बिर्याणी एक तांदूळ व भाज्या मिक्स करून केलेला एक पदार्थ आहे. Veg Biryani – मिक्स बिर्याणी हा पदार्थ चिकन बिर्याणी किंवा हैदराबादी बिर्याणी यावरून प्रेरणा घेऊन केलेली केलेल्या एक पदार्थ आहे. तांदूळ व भाज्या घालून केलेला हा पदार्थ संपूर्ण भारतभर प्रसिद्ध आहे.मिक्स व्हेज बिर्याणी हे थर लावून केली जाते.बिर्याणी खरी तर मुस्लिम राष्ट्राकडून आपल्याकडे आली आहे. इतिहासकाळात मुघल राजाच्या स्वयंपाक घरात बिर्याणी बनवली गेल्याचे काही ठिकाणी उल्लेख केलेला आढळतो. परंतु त्या बिर्याणीत चिकन, मटन घातले जात होते. नंतर त्याच बिर्याणी पासून प्रेरणा घेऊन Veg Biryani – मिक्स बिर्याणी केली जाऊ लागली. मिक्स व्हेज बिर्याणी ही पूर्णपणे भारतीय पदार्थ म्हणून ओळखले जाते. Veg Biryani – मिक्स बिर्याणी ही एक भारतीय भाज्या व भारतीय सुगंधित मसाले वापरून केली जाते.मिक्स व्हेज बिर्याणी ही अनेक वेगवेगळ्या पदार्थात पासून बनवली जाते त्यात वेगवेगळे स्वाद व वेगवेगळ्या सुगंध वापरून केले जाते या बिर्याणी गरम मसाले तळलेला कांदा थोडे दही वापरले जाते. मिक्स व्हेज बिर्याणीची खासियत म्हणजे बिर्याणीच्या प्रत्येक घासात मसाले व भाज्यांचा स्वाद आला पाहिजे.

Veg Biryani – मिक्स बिर्याणी मध्ये कोणकोणते घटक वापरले जातात.

Veg Biryani – मिक्स बिर्याणी तांदूळ,भाज्या,सुगंधित मसाले,दही, सुकामेवा वापरला जातो सर्वात प्रथम मिक्स व्हेज बिर्याणी प्रथम मुख्य घटक म्हणजे तांदूळ असतो.

How To Make Veg Biryani-मिक्स व्हेज बिर्याणी कशी बनवतात.

Veg Biryani – मिक्स बिर्याणी बनवताना प्रथम तांदूळ धुऊन तासभर तरी भिजवला जातो. नंतर तीन पट पाणी घालून त्यात वेलदोडा, दालचिनी,तेज पत्ता घालून उकळायला टाकतात. पाणी उकळले की त्यात तांदूळ घालून शिजवून घेतात. बिर्याणीच्या काही प्रकारात तांदूळ अर्धवट शिजवतात तर काही प्रकारात तांदूळ पूर्ण शिजवतात. अर्धवट शिजवलेला तांदूळ पुन्हा भाज्यांसोबत पूर्णपणे वाफवला जातो. तसेच पूर्ण शिजवलेल्या तांदूळ चाळणीतून निथळून घेतात. नंतर भाज्यांच्या छोट्या आकाराच्या फोडी करून प्रत्येक भाजी गरम पाण्यात उकळून वेगवेगळ्या वाफवल्या जातात. भाज्या वाफव ल्या नंतर त्यात आले, लसूण मिरच्या, गरम मसाला यात घालून भाज्या परतून घेतात. नंतर भाज्या व शिजवलेला तांदूळ यांचे थर देऊन पक्क्या झाकणाच्या भांड्यात परत एकदा वाफवले जाते. बिर्याणी वाफवताना केशराचे दूध घातले जाते.केशरामुळे बिर्याणीचा सुगंध व स्वाद वाढतो. मिक्स बिर्याणी गरम गरमच वाढली जाते. सोबत रायता कांदा, टोमॅटो अशा सॅलड सोबत खाल्ली जाते.

 

साहित्य.

कृती.

भात शिजवणे.

भाज्या वाफवणे.

कांदा तळणे.

Veg Biryani – मिक्स बिर्याणी साठी भाज्याना मसाल्यात परतणे.

टिप्स.

  • बिर्याणीसाठी उत्तम दर्जाचा बासमती तांदूळ वापरावा. तांदूळ जुना असला तर उत्तम कारण जुना तांदळाचे दाणे भात शिजल्यावर एकदम मोकळे होतात नव्या तांदळाचा भात चिकट होतो.
  • बिर्याणी वापरले जाणारे खडा मसाला हा सुद्धा उत्तम सुगंध असलेला वापरावा.म्हणजे बिर्याणीला सुगंध छान येतो.
  • बिर्याणीत वापरले जाणारे दही फार आंबट नसावे आंबट दह्यामुळे बिर्याणीची चव बिघडू शकते.
  • बिर्याणी बनवताना जर तांदूळ अर्धवट शिजवलेला असेल तर व तांदूळ भाज्यांसोबत शिजवणार असाल तर भाज्यांची ग्रेव्ही योग्य प्रमाणात असावी जास्त ग्रेव्ही घातली तर भात शिजल्यावर चिकट होतो.
  • बिर्याणीसाठी तुपाऐवजी तेल घालू शकतात परंतु बिर्याणी करताना बिर्याणीच्या स्वादासाठी तुपाचा पर्याय दिला जातो.
  • मिक्स व्हेज बिर्याणी करताना आवडत असल्यास बिर्याणी मध्ये पनीर तळून घालू शकतात.
  • सुकामेवा वरून घालताना तळून घालावा.

FAQs.

प्रश्न 1. वीस लोकांसाठी किती किलो व्हेज बिर्याणी लागेल ?

उत्तर :- तुम्ही जर फक्त बिर्याणी खाणार असाल तर वीस लोकांसाठी तीन ते साडेतीन किलो व्हेज बिर्याणी लागेल. जर त्यासोबत वेगळे जेवण असेल तर एक ते दीड किलो चालेल.

प्रश्न 2. व्हेज बिर्याणी साठी साधा तांदूळ वापरू शकतो का ?

उत्तर :- व्हेज बिर्याणी साठी साधा तांदूळ वापरू शकतो, परंतु साधा तांदूळ चा भात चिकट होऊ शकतो व बिर्याणीची चव बिघडू शकते. परंतु जर बासमती तांदूळ वापरला तर व्हेज बिर्याणीला छान चव येईल व बासमती तांदुळाचा भात मोकळा व  मऊ शिजतो.

प्रश्न 3. दम बिर्याणी म्हणजे काय ?

उत्तर :- दम बिर्याणी म्हणजे भाज्या व भात वेगवेगळे शिजवून घेतात व एका पक्क्या झाकणाच्या भांड्यात मंद आचेवर वाफवुन घेतात यालाच दम बिर्याणी असे म्हणतात.

Exit mobile version